‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल..’ म्हणत महागाईविरोधात आंदोलन

‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल..’ म्हणत महागाईविरोधात आंदोलन
‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल..’ म्हणत महागाईविरोधात आंदोलन

धुळे : "वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल" अशा पद्धतीच्या घोषणा देत पेट्रोल, डिझेल व इंधनाच्या तसेच खाद्यतेलाच्या वाढत्या दरांविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रीय समता दलातर्फे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी थेट सायकलवर घोषणाबाजी करीत जिल्हाधिकार्यालयात प्रवेश केला. (dhule-news-rashtrit-dal-petrol-price-hike-in-centeral-goverment)

मोदी सरकारने पेट्रोल– डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड दरवाढीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय समता दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहन परवडत नसल्यामुळे सायकलवरच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला. येथे जोरदार घोषणाबाजी केली.

‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल..’ म्हणत महागाईविरोधात आंदोलन
कुत्र्याने बालकास जबड्यात धरून नेले फरफटत; नागरीकांमुळे झाली सुटका

जिल्‍हाधिकारींना दिले निवेदन

जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताना मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत केंद्र सरकारच्या महागाई विरोधाचा धोरणाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यानंतर राष्ट्रीय समता दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या महागाई विरोधी धोरणाविरोधात निवेदन देऊन खाद्य तेलाचे तसेच डिझेल– पेट्रोलचे वाढलेले दर कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com