सैन्‍य दलातील भरती राबवा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

सैन्‍य दलातील भरती राबवा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
सैन्‍य दलातील भरती राबवा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धुळे : केंद्र प्रशासनातर्फे दोन वर्षांपासून रखडलेली सैन्यदलातील भरती प्रक्रिया राबविलेली नाही. ही भरती लवकर राबवावी याकरीता वंचित बहुजन आघाडीतर्फे राष्ट्रपतींना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. (dhule-news-Recruit-in-the-army-Demand-for-a-deprived-Bahujan-Front)

देशात सैन्यदलामध्ये एक लाख ३५ हजार जागा रिक्त असताना देखील गेल्या दोन वर्षांपासून सैन्यदलामध्ये भरती प्रक्रिया केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे सैन्य दलातील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी; या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. सैन्यदलामध्ये रिक्तपदे असताना देखील केंद्र प्रशासनातर्फे सैन्यदलामध्ये भरती प्रक्रिया का राबविले जात नाही? असा प्रश्न देखील यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या निवेदनातून राष्ट्रपतींना विचारला आहे.

सैन्‍य दलातील भरती राबवा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बिजासन घाटात दरड..रात्रीत रस्‍ता केला मोकळा

भरती लवकर राबवावी

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने ग्रामीण परिसरातील तरुण सैन्य भरतीमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सातत्याने तयारी करीत आहेत. त्यापैकी बहुतांश तरुणांची वयोमर्यादा देखील संपत आली असल्यामुळे केंद्र शासनाने याची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर सैन्यदलातील भरती प्रक्रिया राबवावी. अशी विनंती जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com