सेवानिवृत्त सैन्य दलातील जवानाच्या घरात चोरी; पोलिसांतर्फे चोरट्यांचा तपास सुरू

सेवानिवृत्त सैन्य दलातील जवानाच्या घरात चोरी; पोलिसांतर्फे चोरट्यांचा तपास सुरू
सेवानिवृत्त सैन्य दलातील जवानाच्या घरात चोरी; पोलिसांतर्फे चोरट्यांचा तपास सुरू
चोरी

धुळे : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. यातच धुळे शहरातील पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नयना सोसायटी याठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या आर्मी जवानाच्या घरात चोरीचा प्रकार झाला. यात रोख रक्‍कमेसह सोने– चांदीचे दागिने लंपास झाले आहेत. (dhule-news-retired-army-soldier-home-theaf-cash-and-jewellary)

दिपक भिकन पाटील हे सेवानिवृत्त झालेले भारतीय सैन्य दलातील जवान यांच्या नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी ते बाहेरगावी गेले होत. घरी कुणी नसल्याचे बघून चोरट्यांनी घरातील सोने- चांदी त्याचबरोबर दीड लाखांची रोकडवर हात साफ करून पोबारा केला आहे. सकाळी घरमालकांना दरवाजा उघडा दिसल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसले. त्यानंतर घरात चोरी झाली असल्याची अंदाज आल्याने त्यांनी तात्काळ दीपक पाटील यांना घटनेची माहिती दिली. यासंदर्भात पश्‍चिम देवपूर पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी त्याचबरोबर डीवायएसपी दिनकर पिंगळे हे श्वानपथक व इतर तपास यंत्रणांच्या सह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनातर्फे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

चोरी
डबक्‍यातील पाण्यात कागदी नाव सोडून राष्‍ट्रवादीचे आंदोलन

रोख रक्‍कम व दागिने लंपास

कोणी नसल्याचं बघून चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपये रोख रक्कम त्याचबरोबर नऊ तोळे सोने व दहा भार चांदी एवढा ऐवज लंपास करून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com