विवाह काही दिवसांवर अन्‌ एकुलत्‍या एक मुलाचा मृत्‍यू

विवाह काही दिवसांवर अन्‌ एकुलत्‍या एक मुलाचा मृत्‍यू
विवाह काही दिवसांवर अन्‌ एकुलत्‍या एक मुलाचा मृत्‍यू
Death

साक्री (धुळे) : शहरातील कुटूंबाचा आधार असलेल्या एकुलत्‍या एक मुलाचा डेग्यूसदृश आजाराने नाशिक येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. काही दिवसांवर विवाह असल्‍याने त्‍याची तयारी देखील सुरू होती. या प्रकारानंतर साथीच्या आजांरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलले जाण्याची अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे. (dhule-news-sakri-Death-by-dengue-fever-an-only-child-within-a-few-days-of-marriage)

कुणाल चव्हाण असे मयत तरुणाचे नाव असून आई- वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. विशेष म्हणजे येत्या २९ नोव्हेंबर रोजी त्याचा मामाच्या मुलीशी विवाह होणार होता. मात्र तत्पूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली अन् हसता खेळता चव्हाण परिवार एकुलत्या मुलाच्या अचानक जाण्याने दुःखाच्या खाईत लोटला गेला.

Death
भारनियमन टाळण्यासाठी कृषिपंपांच्या पुरवठ्यात घट

अवघ्या दोन दिवसात होत्‍याचे नव्‍हते झाले

कुणाल हा शहरातील सि. गो. पाटील महाविद्यालयात सहाय्यक प्रयोग शाळा परिचर होता. त्याचे वडील मुद्रांक विक्रेते असून सेतू सेवा केंद्र चालवतात. तर आई निजामपूर पोलीस ठाण्यात एएसआय म्हणून कार्यरत आहे. तर कुणालला दोन विवाहित बहीणी आहेत. गेल्या पाच- सहा दिवसांपूर्वी कुणालची तब्येत अचानक बिघडली. त्याला उपचारार्थ धुळे आणि तेथून नाशिक येथे खाजगी दवाखान्‍यात हलवण्यात आले. त्यावेळेस त्याला डेंगू सदृश्‍य आजार झाल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दोन- तीनच दिवसांत त्याची प्रकृती खालावली आणि अखेर काळाने त्याच्यावर झाडप घातली.

Related Stories

No stories found.