लाटीपाडा धरण झाले 'ओव्हरफ्लो'
लाटीपाडा

लाटीपाडा धरण झाले 'ओव्हरफ्लो'

लाटीपाडा धरण झाले 'ओव्हरफ्लो'

धुळे : जिल्ह्यामध्ये वरूणराजाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक देखील अडचणीत सापडले होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या अखेर गेल्या काही दिवसांपासून साक्री तालुक्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरी मुळे साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण 'ओव्हरफ्लो' झाले आहे. (dhule-news-sakri-taluka-Latipada-dam-overflows-courinue-and-heavy-rain)

लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्‍याने शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. शेतकऱ्यांसह सर्वांनाच लाटीपाडा धरण कधी भरणार याची उत्सुकता होती. दरम्यान, गेल्या ८ ते १० दिवसांपासून शहरासह पश्चिम पट्ट्यात अधून– मधून जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत होती. अखेर धरण आता पूर्ण क्षमतेने भरुन ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे.

लाटीपाडा
ओबीसी आरक्षण..लातुरात विविध ठिकाणी भाजपाचे आंदोलन

साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाची क्षमता १२५८ एमसीएफटी आहे. परिसरासाठी हे धरण खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे लाटीपाडा धरण कधी भरणार, याकडे शेतकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून होते. गेल्या ८ ते १० दिवसांपासून शेरास पश्चिम पट्ट्यात अधून मधून जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत होती. अखेर मंगळवारी धरण शंभर टक्के भरुन पहाटे 4 वाजेच्या सुमारास 'ओव्हरफ्लो' झाले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com