नुकसानग्रस्त पिकांची पाहणी; भरपाईचे आमदार मंजुळा गावित यांचे आश्वासन

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी; भरपाईचे आमदार मंजुळा गावित यांचे आश्वासन
नुकसानग्रस्त पिकांची पाहणी; भरपाईचे आमदार मंजुळा गावित यांचे आश्वासन
Manjula gavit

धुळे : साक्री तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार मंजूळा गावित यांनी केली.

साक्री तालुक्यातील पारगांव, मंडाणे व सितारामपूर येथे अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसल्याचे समजल्यानंतर या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी संबंधित तहसील अधिकारी त्याचबरोबर साक्री तालुक्याचे कृषी अधिकाऱ्यां सोबत घेऊन नुकसानग्रस्त पिकाची थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे.

भरपाईचे आश्वासन

यावेळी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा करण्यास देखील सुरुवात केली असून पुढील काही दिवसांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आमदार मंजुळा गावित यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाहणी वेळी दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com