Dhule: धुळे शहरातील शाळांची घंटा वाजली; विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच

धुळे शहरातील शाळांची घंटा वाजली; विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच
school open
school opensaam tv

धुळे : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आजपासून धुळे (Dhule) शहरातील पहिली ते आठवीचे वर्ग कोरोनाच्या नियमांचे (Corona Rules) पालन करीत सुरू झाले आहेत. (dhule news School oepn in Dhule city Student attendance is low)

school open
खानदेशातील १ लाख ६१ हजार ७०० शेतकऱ्यांनी भरले वीजबिल

शालेय शिक्षण विभागाने (Education Department) ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग (Corona) कमी आहे. त्याठिकाणी नियमावलीसह शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला. त्यानुसार मागील आठवड्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्‍या. यानंतर धुळे शहरातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.

पालकांमध्‍ये अजूनही संभ्रम

शहरातील कमलाबाई स्कुलच्या मुख्याध्यापिकांनी पालकांमध्ये अजूनही संभ्रम असल्यामुळे शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्पशा असल्याचे सांगितले. शासनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनीदेखील विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क देऊनच शाळेमध्ये निश्चिंत होऊन पाठवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com