Health News: धुळे शहरात सात बालके ‘गोवर पॉझिटिव्ह’

धुळे शहरात सात बालके ‘गोवर पॉझिटिव्ह’
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : राज्यात काही ठिकाणी गोवर साथीचा फैलाव झाला. यात आता धुळे शहराचा समावेश झाला आहे. धुळे (Dhule) शहरात तर गोवरने यापूर्वीच शिरकाव केल्याचे आता समोर आले आहे. नोव्हेंबरमध्ये मंगळवार (ता. २२) पर्यंत शहरात ३१ संशयित रुग्ण होते, त्यात बुधवारी पुन्हा दोन संशयित रुग्णांची भर पडली. त्यातच बुधवारी प्राप्त अहवालानुसार गोवरचे सात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचेही समोर आले. त्यामुळे धुळेकरांसाठीही (Dhule News) ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जाते. (Letest Marathi News)

Dhule News
Nashik Recruiting: नाशिक महापालिकेत विविध पदांसाठी भरती; २४ वर्षांपासून रखडलेल्या नोकरभरतीला अखेर मुहूर्त

राज्यात (Mumbai) मुंबई, ठाणे, पनवेलसह इतरही काही ठिकाणी गोवरबाधित बालके आढळून येत आहेत. मुंबई, ठाण्यात तर गोवर साथीचा फैलाव होऊन काही मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्या- त्या शहरांमध्ये आरोग्य विभाग (Health Department) सक्रिय झाला आहे. दरम्यान, धुळे शहरातही गोवरने शिरकाव केल्याचे आता समोर आले आहे. एप्रिल ते २२ नोव्हेंबरदरम्यान एकूण ५७ गोवर संशयित रुग्ण आढळून आले. यात बुधवारी (ता. २३) पुन्हा दोन रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण गोवर संशयितांचा आकडा ५९ झाला आहे. विशेष म्हणजे केवळ नोव्हेंबरमध्येच तब्बल ३३ संशयित आढळून आले आहेत.

सात पॉझिटिव्ह

संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. बुधवारी प्राप्त अहवालानुसार सात बालकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अर्थात सात बालकांना गोवर झाल्याचे निश्‍चित झाले आहे. संशयित रुग्ण व तपासणीअंती पॉझिटिव्हचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोवरचा फैलाव वाढू नये यासाठी कार्यवाही गरजेची आहे.

पॉझिटिव्ह बालके लशीपासून दूरच

आतापर्यंत शहरात आढळलेली सात पॉझिटिव्ह बालके शहरातील हजारखोली भागातील असल्याची माहिती मिळाली. याशिवाय गोवर संशयित बालके प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील आहेत. दरम्यान, जी बालके गोवर पॉझिटिव्ह निघाली आहेत, त्यांचे लसीकरणही झाले नसल्याचीही माहिती मिळाली.

गोवरपासून संरक्षणासाठी पालकांनी आपल्या मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस देणे आवश्‍यक आहे. महापालिकेच्या दवाखान्यात ही लस उपलब्ध आहे. बालकांमध्ये सर्दी, खोकला, तीव्र ताप, अंगावर पुरळ येणे, डोळ्यातून पाणी येणे आदी लक्षणे असतील तर तत्काळ त्यांना उपचारासाठी दवाखान्यात न्यावे.

- एम. एम. शेख, आरोग्याधिकारी, मनपा धुळे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com