पेट्रोल पंपावर ट्रक लुटीचा प्रयत्‍न; थरार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

पेट्रोल पंपावर ट्रक लुटीचा प्रयत्‍न; थरार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद
सीसीटीव्‍ह
सीसीटीव्‍ह

धुळे : पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या आयशरवर अज्ञात हल्लेखोरांकडून लुटीचा प्रयत्‍न करण्यात आला. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. (dhule-news-shirpur-Attempted-truck-robbery-at-a-petrol-pump-Captured-in-thriller-CCTV)

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री साडेतीनच्या दरम्यान उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर अज्ञातांनी दरोड्याच्या हेतूने हल्ला केला. ह्या हल्ल्या दरम्यान आयशरमधील चालक व वाहक किरकोळ जखमी झाले असून रात्री साडेतीन वाजेच्या दरम्यान या हल्लेखोरांनी ट्रकवर दगडफेक केली. हातात असलेल्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटीचा प्रयत्न केला. परंतु चालक वाहकाने जवळ असलेल्या लोखंडी टामीच्या सहाय्याने प्रतिकार केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी वाहनापासून दूर जाऊन वाहनावर जोरात दगडफेक केली. त्यानंतर हल्लेखोरांनी अंधाराचा सहारा घेत पळ काढला आहे.

पंधरा दिवसानंतर कन्नड घाटातून वाहतूक सुरु; अवजड वाहनांना मात्र बंदीच

हल्लेखोरांचा शोध सुरू

सदर हल्ल्याचा सर्व थरार पेट्रोल पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून या संदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून थाळनेर पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com