मालक झाले अन्‌ अडचणीत आले

शहरालगतच्या भागापैकी सर्वाधिक जलद विकसित होणारे शिवार म्हणून खर्दे बुद्रुकची ख्याती आहे. शिरपूर-सावळदे या महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर असल्यामुळे तेथे प्लॉटिंग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले.
मालक झाले अन्‌ अडचणीत आले
Land fraud

शिरपूर (धुळे) : विकसकाच्या गोड शब्दांना आणि प्लॉटिंगचे नामधारी का असेना, मालक म्हणून नाव लागण्याच्या मोहाला भुलून स्वतःची शेती एन.ए. करून घेणाऱ्या खर्दे बुद्रुक (ता. शिरपूर) शिवारातील शेतकऱ्यांवर आता प्लॉटधारकांच्या मागण्यांना तोंड देण्याचा प्रसंग ओढवला आहे. एन.ए.च्या तांत्रिक बाजूंची कोणतीही माहिती नसल्यामुळे प्लॉटधारकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना संबंधित शेतकरी वैतागले आहेत. (dhule-news-shirpur-farmer-name-land-but-contractor-fraud)

शहरालगतच्या भागापैकी सर्वाधिक जलद विकसित होणारे शिवार म्हणून खर्दे बुद्रुकची ख्याती आहे. शिरपूर-सावळदे या महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर असल्यामुळे तेथे प्लॉटिंग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यातही एसव्हीकेएम संकुलाचे भव्य मेडिकल कॅम्पस साकारले जात असल्याने रात्रीतून तेथील जमिनीला सोन्याचे मोल आले. तेथील शेतजमिनी एकापाठोपाठ बिगरशेती (एन.ए.) प्रयोजनार्थ वर्ग करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यात अशा जमिनी खरेदी करून नंतर बिगरशेती करणारे विकसक आहेत.

हमी देणारे दलाल

शेतकऱ्यांना भागीदार बनवून जमीन एन.ए.करून आणण्याची जबाबदारी घेणारे व्यावसायिक आहेत, तसेच थेट शेतकऱ्यांना गाठून ‘तुम्हीच मालक व्हा, आम्ही जमीन एन.ए. करून आणतो’, अशी हमी देणारे दलालही आहेत.

Land fraud
जळगाव जिल्ह्यात सात टक्के पाणीसाठा कमी

शेतकरी केवळ नामधारी

शेतजमिनी मूळ मालकाच्या नावावरच एन. ए. केल्यास अनेक कटकटी वाचतात, असे वरवरचे कारण दाखवून व्यवहार करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. प्रत्यक्षात एन. ए. करताना संबंधित क्षेत्रात द्यावयाच्या सोयी, नियम व अटी याबद्दल शेतकऱ्यांना कसलीच माहिती नसते. तो केवळ नामधारी मालक असतो. तेथील प्लॉट विक्री झाल्यानंतर खऱ्या वादाला सुरवात होते. रस्ते, पथदीप, पाणी, गटारी अशा सुविधा कधी देणार? या प्रश्नाला शेतकऱ्याकडे उत्तर नसते. त्यामुळे अशा बाबींनी कायदेशीर तक्रारींचे वळण घेतल्याच्याही काही घटना घडल्या आहेत. त्यात कागदोपत्री मालक असलेला शेतकरीच भरडला जात आहे. त्यामुळे शेतजमीन विक्री आणि बिगरशेती प्रयोजनार्थ वर्ग करण्याचे व्यवहार करताना शेतकऱ्यांना पुरेशी काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com