डबक्‍यातील पाण्यात कागदी नाव सोडून राष्‍ट्रवादीचे आंदोलन

डबक्‍यातील पाण्यात कागदी नाव सोडून राष्‍ट्रवादीचे आंदोलन
डबक्‍यातील पाण्यात कागदी नाव सोडून राष्‍ट्रवादीचे आंदोलन
Shirpur palika

शिरपूर (धुळे) : शहरातील मोकळ्या मैदानावर मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत पालिका कुठलीही हालचाल करत नाही. असा आरोप करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी डबक्‍यातील पाण्यात कागदी नावा सोडून निषेध व्यक्त केला. (dhule-news-shirpur-palika-against-NCP-movement-leaving-a-paper-boat-in-the-water-in-the-puddle)

शहरातून जाणाऱ्या शिरपूर- चोपडा रस्त्यालगत पित्रेश्वर कॉलनीच्या रिक्षा स्टॉपजवळ मोठ्या मैदानात पावसामुळे तळे साठले आहे. त्यात डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डेंग्यूचा साथसंसर्ग फैलावण्याची भीती असल्याच्या तक्रारी परिसरातून होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

Shirpur palika
पाचशे कोटी भेट नसून हा तर आमचाच थकलेला पगार..एसटी संघटनांची तीव्र प्रतिक्रीया

पालिकेविरोधात घोषणा

मैदानावरील डबक्यात कागदी नावा सोडून पालिकेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आजच्‍या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन, जेष्ठ नेते रमेश करंकाळ, प्रवक्ते हेमराज राजपूत, शहर कार्याध्यक्ष संजय पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे अश्फाक सय्यद, तालुका संघटक प्रल्हाद पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय शहराध्यक्ष राकेश थोरात, सचिन निकम, रुपेश चव्हाण, सादिक शेख आदी सहभागी होते.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com