एकाच वेळेस 23 अवैध सावकारांवर गुन्हा दाखल

एकाच वेळेस 23 अवैध सावकारांवर गुन्हा दाखल
एकाच वेळेस 23 अवैध सावकारांवर गुन्हा दाखल
Dhule NewsSaam tv

धुळे : संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणाऱ्या अवैध सावकार राजेंद्र बंब प्रकरणानंतर धुळे जिल्ह्यामध्ये विविध पोलिस ठाण्यांमध्ये अवैध सावकारी विरोधात गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. त्यातच शनिवारी शिरपूर (Shirpur) शहर पोलीस ठाण्यात एकाच वेळी तेवीस अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर धुळे शहर पोलिस (Police) ठाण्यात देखील एका सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule news shirpur police 23 illegal moneylenders were charged)

Dhule News
‘सीआयडी’चे पथक चौकशीसाठी वरणगावात

धुळे (Dhule) जिल्ह्यात अवैध सावकारी प्रकरणी विविध गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून शिरपूर शहरात प्रथमच एकाच दिवशी तब्बल 23 सावकार विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरपूर शहरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने कर्जापोटी 23 सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. मात्र संशयित आरोपींनी 30 ते 40 टक्के मासिक व्याज आकारून ही अतिरिक्त पैशांची मागणी करून त्याचे आर्थिक व मानसिक शोषण केले. तसेच व्याजासह पैसे न दिल्यामुळे वेळोवेळी आरोपींनी संबंधित तक्रारदाराच्या घरात घुसून विविध बँकांचे सह्या केलेले धनादेश, दहा हजारांचा लाऊडस्पीकर, चाळीस हजाराचा लॅपटॉप आणि बाराशे रुपयांचा पॉवर बँक असा मुद्देमाल तसेच घर आणि दुकानातील सामान देखील घेऊन गेले. वेळोवेळी अश्लील शिवीगाळ करून हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा देखील आरोप संबंधिताने केला आहे.

व्‍याजाची वसुली करूनही पैशांची मागणी

यासोबतच मोठ्या प्रमाणात व्याजाची वसुली करून देखील अतिरिक्त पैशांची मागणी करत असल्याने त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने याप्रकरणी शिरपूर पोलिसात तक्रार दिली आहे. मिळालेल्या तक्रारीनुसार शिरपूर शहर पोलिसांनी जवळपास 23 अवैध सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये फोफावत असलेल्या अवैध सावकारी वर चाप बसविण्याच मोठं आव्हान आता धुळे पोलिसांवर असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com