स्‍वखर्चातून रस्‍त्‍याची डागडुजी; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

स्‍वखर्चातून रस्‍त्‍याची डागडुजी; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
स्‍वखर्चातून रस्‍त्‍याची डागडुजी; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
रस्‍त्‍याची डागडुजी

धुळे : महामार्ग असो की गावांना जोडणारे रस्‍ते. प्रत्‍येक रस्‍त्‍यांवर खड्डेच दिसतात. यामुळे वाहनधारक देखील त्रस्‍त झाले आहेत. रस्‍त्‍यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला व स्वखर्चाने खड्डे बुजवायला सुरवात केली. (dhule-news-shirpur-Road-repairs-at-one's-own-expense-Social-worker-initiative)

रस्‍त्‍याची डागडुजी
आठ महिन्‍याच्‍या गर्भवतीला दुचाकीची समोरून धडक; महिलेचा मृत्‍यू

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये शिरपूर– वाघाडी रस्त्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून अक्षरशः दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर पडलेले खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. तसेच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

कार्यकर्ते सरसावले

रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी धारक त्याचबरोबर इतर वाहनधारक खूपच मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. त्याचबरोबर अपघातातून वाहनधारकांच्या जीवावर देखील बेतत होते. यासंदर्भात प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे बघितल्यानंतर शिरपूर तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते पुढे आले व त्यांनी स्वखर्चातून हे खड्डे बुजवण्याचा व प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com