आठ लाखांचा अपहार; ग्रामसेवक निलंबित

आठ लाखांचा अपहार; ग्रामसेवक निलंबित
आठ लाखांचा अपहार; ग्रामसेवक निलंबित
Fraud

शिरपूर (धुळे) : ग्रामपंचायत कारभारात आठ लाखांचा अपहार केल्याच्या संशयावरून चांदसे- चांदसूर्या (ता. शिरपूर) येथील ग्रामसेवक राजेंद्र सोनू महाले यांना निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे यांनी दिले. (dhule-news-shirpur-taluka-grampanchayat-eight-lakhs-fraud-Gramsevak-suspended)

महाले यांच्या कारभाराबाबत तक्रारी झाल्याने शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत महाले यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत पीएफएमएस प्रणालीचा वापर न करता धनादेशाद्वारे तीन लाख ९२ हजार ६३६ रुपयांची देयके दिल्याचे आढळले. या रकमेचा भरणा करण्याचे आदेशही त्यांनी पाळले नाहीत.

Fraud
जळगावात नवा प्रयोग..करवंदाची शेती फुलवली अन्‌ लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न

ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना त्यांना कोणतीही सूचना न देता त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा परस्पर वापर करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण सात व्यवहारांपोटी चार लाख एक हजार ७०० रुपयांचा अपहार केला. रोहयो कामाबाबत माधवराव दोरीक यांनी तक्रार केली होती. तिच्या सुनावणीसाठी पाचारण करूनही महाले हजर राहिले नाहीत व त्यांनी संबंधित कागदपत्रेही उपलब्ध करून दिली नाहीत. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचा भंग केल्याने महाले यांना निलंबित करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com