एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर धुळ्यात शिवसैनिक आक्रमक

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर धुळ्यात शिवसैनिक आक्रमक
Shiv Sena
Shiv SenaSaam tv

धुळे : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या बंडखोरीच्‍या विरोधात धुळ्यात (Dhule) शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (dhule news Shiv Sainiks attack in Dhule after Eknath Shinde rebellion)

मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बहुतांश आमदार शिवसेनेशी बंडखोरी करताना दिसून येत आहेत. या सर्व बंडखोर आमदारांच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यानंतर धुळ्यात देखील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायमस्वरूपी भक्कम उभे राहणार असल्याचे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com