शिवसेनेची शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम

शिवसेनेची शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम
Dhule Shiv Sena News
Dhule Shiv Sena NewsSaam tv

धुळे : शहराजवळ असलेल्या जिल्हा शासकिय हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (Hospital) आवारामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील आरोग्य धोक्यात येण्याची भीती सामाजिक संघटनांतर्फे वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून (Shiv Sena) शिवसेनेच्यावतीने आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्‍वच्‍छता मोहिम राबविली.

शिवसेनेने राबविलेल्‍या कचरा स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत उचलण्यात आला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवत रुग्णालय (Dhule) परिसरामधील घाण कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविली आहे. परिसरामध्ये अशा पद्धतीने घाण व कचरा साचू न देण्याचे आव्हान यावेळेस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केले. यापुढे रुग्णालय परिसरात घाण व कचरा साचल्याचे आढळून आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्यावतीने रुग्णालय प्रशासनाला देण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com