Dhule: गुटख्याची तस्करी; ट्रॅव्हल्ससह ७६ लाखांचा माल जप्त

गुटख्याची तस्करी; ट्रॅव्हल्ससह ७६ लाखांचा माल जप्त
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे एलसीबीच्या पोलिस पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावर २२ सप्‍टेंबरला पहाटे लळिंग टोल नाक्याजवळ सापळा रचला. त्यात (Madhya Pradesh) मध्य प्रदेशकडून धुळेमार्गे मालेगावच्या (Malegaon) दिशेने जाणाऱ्या दोन ट्रॅव्हल्स रोखल्या. या ट्रॅव्‍हल्समध्ये पाऊण कोटी किंमतीचा गुटखा होता. त्यासह पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (Dhule LCB News)

Dhule News
Ajit Pawar: फोडाफोडीच्‍या राजकारणातून स्थिरता कशी राहणार; अजित पवारांची शिंदे– फडणवीस सरकारवर टीका

राज्यात बंदी असलेल्या (Gutkha) गुटखा, पान मसाल्याची परराज्यातून तस्करी होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी एलसीबीला (Dhule LCB) दिली. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पहाटे लळिंग टोल नाक्याजवळ पथकाद्वारे सापळा रचला. मध्य प्रदेशमधील हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन बसेसद्वारे पान मसालासह गुटखा मालेगावकडे विक्रीसाठी नेला जात असताना, या बसेस पोलिस पथकाने रोखल्या. चौकशीत दोन्ही ट्रॅव्हल्सच्या चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

सहा संशयीत ताब्‍यात

पथकाने तपासणीत ट्रॅव्हल्ससह ७६ लाख २८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक मोहंमद रईस गुलजार अहमद, शेख रमजान शेख शुबराती, रघुराज दुर्गा मीना, मोहंमद अशरफी अब्दुल अजीज शेख, राजेश गणेश बिसोदीया, हरी शंकर यादव (सर्व रा. मध्यप्रदेश) या सहा संशयितांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोराडे, उपनिरीक्षक सूर्यवंशी, सहाय्यक अधिकारी संजय पाटील, पथकातील कर्मचारी संदीप सरग, पंकज खैरमोडे, मयूर पाटील, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, तुषार पारधी, किशोर पाटील, सुनील पाटील यांनी ही कारवाई केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com