स्पिरीटने भरून जाणारा ट्रक पकडला; धुळे पोलिसांची कारवाई

स्पिरीटने भरून जाणारा ट्रक पकडला; धुळे पोलिसांची कारवाई
dhule police
dhule police

धुळे : स्पिरीट भरून अवैधरित्या वाहून नेणाऱ्या आईसर ट्रकसह तब्बल आठ लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला. (dhule-news-Spirit-caught-the-filling-truck-Dhule-police-action)

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली होती. पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मुंबई- आग्रा महामार्गावरून शिरपूर कडे आईसर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे स्पिरिट अवैधरित्या वाहून नेले जाणार आहे.

dhule police
पाणी आणण्यासाठी गेलेला बालक आलाच नाही; शेतात विजेच्या धक्क्याने मृत्यू

१४ ट्रममध्‍ये स्पिरिट

गुप्‍त माहितीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी पथक तैनात करून सापळा रचला असता या दरम्यान तैनात असलेल्या पोलिसांना सदर आईसर ट्रक आढळून आला. पोलिसांनी तात्काळ या आईसर ट्रक चालकाला वाहन रस्त्याच्या बाजूला थांबविण्यास सांगितले. त्यानंतर आईसर ट्रकमध्ये काय आहे? या संदर्भात विचारणा केली असता चालकाने वाहनामध्ये स्पिरीट भरलेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खात्री केली असता ट्रकमध्ये तब्बल स्पिरिटने भरलेले १४ ड्रम आढळून आले आहेत. पोलिसांनी आयशर ट्रक चालकासह जवळपास आठ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com