St Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांला सामाजिक संघटनांचा मदतीचा हात

संपादरम्यान राज्य शासनातर्फे कुठल्याही प्रकारचे मानधन या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दिले जात नाही.
St Strike
St Strikesaam tv

धुळे : राज्‍यातील एसटी कर्मचारी गेल्‍या दोन महिन्‍यांपासून संपावर आहेत. शासन दरबारी अद्याप मागणीबाबत निर्णय होत नसल्‍याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. संप काळात कर्मचारींना पगार किंवा मानधन नसल्‍याने कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्‍न आहे. यामळे सामाजिक संघटना पुढे येवून एसटी कर्मचाऱ्यांसाठी (St Employee) मदतीचा हात पुढे करत आहेत. (dhule news St Strike help of social organizations to the families of ST employees)

St Strike
Nylon cord: नायलॉन मांजाची छुपी विक्री; बारा विक्रेत्‍यांवर कारवाई

गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यापासून एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर (St Strike) ठाम आहे. अशातच संपादरम्यान राज्य शासनातर्फे कुठल्याही प्रकारचे मानधन या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. त्यामुळे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये; यासाठी आता सामाजिक संघटनांसह सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत.

महिनाभराचा किराणा

आपल्या हक्काच्या लढाईसाठी संपावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये; यासाठी धुळ्यातील (Dhule) सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतका किराणा देऊ केला आहे. यामुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळाली असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने लढा सुरू ठेवण्याच्या निश्चय केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com