St Strike: एसटी आंदोलक कृती समितीच्या निर्णयानंतरही आंदोलनावर ठाम

एसटी आंदोलक कृती समितीच्या निर्णयानंतरही आंदोलनावर ठाम
St Strike
St Strikesaam tv

धुळे : एसटी महामंडळ राज्य शासन विलगिकरना संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकी दरम्यान कृती समितीने निर्णय दिला. मात्र हा निर्णय मान्‍य नसल्‍याचे सांगत धुळ्यातील (Dhule) कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे. (dhule news st strike ST employee insist on agitation even after decision of action committee)

St Strike
Dhule: विनामास्‍क दंडाची रक्‍कम वाढली; मग दंडापेक्षा मास्क फायद्याचा

एसटी कर्मचाऱ्यांच्‍य (St Strike) आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्‍यस्‍थी करत कृती समितीसोबत बैठक झाली. परंतु, धुळे मध्यवर्ती आगाराशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे कृती समितीने घेतलेला कुठल्याही प्रकारचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याची भूमिका धुळ्यातील एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी (Dhule St Employee) स्पष्ट केली आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही; अशी भूमिका एसटी आंदोलकांनी ठामपणे घेतली आहे. त्यामुळे धुळ्यातील एसटी आंदोलन कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

आंदोलन करत घोषणाबाजी

गेल्‍या दोन महिन्‍यांपासून आंदोलन सुरू असून, कालच्‍या बैठकीत देखील तोडगा न निघाल्‍यामुळे धुळ्यातील एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी आज देखील आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com