अर्धनग्न आंदोलन करत एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाचा निषेध

अर्धनग्न आंदोलन करत एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाचा निषेध
अर्धनग्न आंदोलन करत एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाचा निषेध

धुळे : एसटी कर्मचारी आंदोलनादरम्यान साक्री आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. याप्रकरणी राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आज अर्धनग्न आंदोलन केले. (dhule-news-ST-workers-protesting-against-the-government-by-carrying)

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. साक्री बस आगारामध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना राज्य परिवहन महामंडळातर्फे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे सत्र सुरू करण्यात आल्यानंतर धुळ्यातील साक्री येथील पाच कर्मचाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे. याचा निषेध करत असताना साक्री बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाचा अर्धनग्न आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे.

सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात येणार नाही, तोपर्यंत आपले आंदोलन अशाच पद्धतीने सुरु ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com