Dhule Breaking..आगारातून सोडलेल्या चार बसवर दगडफेक

धुळे ब्रेकिंग..आगारातून सोडलेल्या चार बसवर दगडफेक
Dhule Breaking..आगारातून सोडलेल्या चार बसवर दगडफेक
ST Bus

धुळे : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचारींचा संप सुरू असताना आज प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कामावर घेत बससेवा सुरू केली. या दरम्‍यान धुळे आगार बसस्‍थानकातून चार बस सोडल्‍यानंतर मार्गस्‍थ झाल्‍या. परंतु, या चार बसवर अज्ञातानी हल्‍ला करत बस फोडल्‍याचा प्रकार घडला. (Dhule-news-Stone-throwing-on-four-buses-released-from-the-depot)

ST Bus
नवीन चालकांच्‍या हाती स्‍टेअरींग..गोंधळानंतर जळगावातून धुळ्यासाठी पहिली बस रवाना

धुळे परिवहन विभागातर्फे यापूर्वीच एसटी भरतीमध्ये निवड झालेल्या परंतु अद्यापपर्यंत सेवेत रुजू न करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. धुळे एसटी आगारातून एसटी बस बाहेर पडत असताना आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बघावयास मिळाला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना न जाणून घेता प्रशासनातर्फे बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बसवर दगडफेक

तब्बल १४ दिवसानंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटामध्ये या बसेस आगारा बाहेर पडल्‍या. परंतु या बस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी चार बसवर दगडफेक केली आहे. त्यामध्ये एक एसटी चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com