विद्यार्थीनी आत्‍महत्‍या प्रकरण; वसतीगृहातील गृहपाल तडकाफडकी निलंबित

विद्यार्थीनी आत्‍महत्‍या प्रकरण; वसतीगृहातील गृहपाल तडकाफडकी निलंबित
विद्यार्थीनी आत्‍महत्‍या प्रकरण; वसतीगृहातील गृहपाल तडकाफडकी निलंबित
Dhule NewsSaam tv

निमगूळ (धुळे) : शासकीय वस्तीगृहात विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. वसतीगृहाच्‍या गृहपाल घटनास्‍थळी उपस्‍थीत नसताना त्‍यांना कळविल्‍यानंतर देखील त्‍या आल्‍या नाही. या कारणावरून (Dhule News) गृहपाल श्रीमती जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. (dhule news Student suicide case The housekeeper of the hostel was suddenly suspended)

Dhule News
हृदयद्रावक..नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यु

दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यावरील असलेल्या शासकीय वस्तीगृहात विद्यार्थीनीने ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना 15 रोजी सायंकाळी घडली होती. त्याठिकाणी गृहपाल रीना गिरीधारीलाल जाधव या घटनास्थळी नव्हत्या. त्यानंतर त्यांना काळविण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी नसल्याने एक जबाबदार अधिकारी नसल्याने नातेवाईकांसह उपस्थितांनी संताप व्यक्त केला होता. त्याची दखल घेत प्रकल्प अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी येथील प्रभारी गृहपाल ह्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी गृहपाल रीना जाधव यांचे निलंबनाचे आदेश पारित केले आहे. मात्र हे प्रकरण आणखी सखोल चौकशी केली तर काय वळण घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com