कृषी सहाय्यकाच्या आत्महत्येनंतर सावकारी जाचाचे पितळ उघळे

कृषी सहाय्यकाच्या आत्महत्येनंतर सावकारी जाचाचे पितळ उघळे
कृषी सहाय्यकाच्या आत्महत्येनंतर सावकारी जाचाचे पितळ उघळे

भूषण अहिरे

धुळे : शिरपुर तालुक्यातील जातोडे शिवारात गेल्या पाच दिवसांपूर्वी बाळदे येथील कृषी सहाय्यक अधिकाऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करत असताना शिरपूर पोलिसांना जी माहिती समोर आले आहे. त्यानुसार सावकारांच्या जाचाला कंटाळून प्रभाकर तुळशीराम पाटील यांनी आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. (dhule-news-suicide-of-the-agricultural-assistant-the-brass-of-the-lender's-investigation-was-exposed)

बाळदे येथील शेतकरी व कृषी सहाय्यक प्रभाकर तुळशीराम पाटील (वय ४५) यांचा ११ जुलैला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वार्डबॉयच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

सावकारांकडून दिल्‍या जात होत्‍या धमक्‍या

याप्रकरणी मयत प्रभाकर पाटील यांना शिरपुरमधील काही सावकारांनी मोठ्या प्रमाणात व्याज आकारणी करुन कर्ज दिले होते. त्या कर्जाच्या वसुलीसाठी सतत धमक्या देवून त्यांना त्रास दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पाटील यांच्या पत्नी गायत्री पाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली होती.

कृषी सहाय्यकाच्या आत्महत्येनंतर सावकारी जाचाचे पितळ उघळे
दोन महिन्यात साडे दहा लाखाची कमाई; काश्मीरी चाखणार दहिवदच्या टरबूजची चव!

एकाला घेतले ताब्यात

शिरपूर शहर पोलीस ठाण्यात १३ जुलैला रात्री दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त व महाराष्ट्र सावकारी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात एका सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिरपूर पोलिस ठाण्यात सावकारी पैशातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तपासाधिकाऱ्यांनी दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com