तमाशा व्यावसायिक पुन्हा अडचणीत; भोंगे बंदीचा फटका

तमाशा व्यावसायिक पुन्हा अडचणीत; भोंगे बंदीचा फटका
तमाशा व्यावसायिक पुन्हा अडचणीत; भोंगे बंदीचा फटका
Dhule NewsSaam tv

धुळे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याचा फटका आता तमाशा व्यवसायिकांना देखील बसू लागला आहे. जवळपास दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) सर्व यात्रा उत्सव बंद असल्यामुळे तमाशा देखील बंद होता आणि त्यामुळे तमाशा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. (Dhule news tamasha fad trouble again The blow of the horn ban)

Dhule News
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात भाजपचे चाबूक मारो आंदोलन

कोरोना काळात तमाशा बंद असल्यामुळे व कमाईचे साधनच बंद असल्यामुळे उपासमारीची देखील वेळ तमाशा व्यावसायिकांवर ओढावली होती. परंतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यात्रा उत्सवांना प्रशासनातर्फे परवानगी देण्यात आली. यामुळे यंदा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव सुरू आहेत.

तमाशाचा फड शांतच

यात्रेदरम्यान तमाशा फडांना देखील मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागांमध्ये पसंती दिली जाते. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता यात्रेमध्ये भरवल्या जाणाऱ्या तमाशा कार्यक्रमात भोंग्याविना तमाशा होणे शक्य नसल्यामुळे त्याचा सरळ सरळ फटका हा तमाशा व्यवसायिकांना बसू लागल्याचे दिसून येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.