धुळ्यात तापमानाचा पारा घसरला; उष्ण झळांपासून काहीसा दिलासा

धुळ्यात तापमानाचा पारा घसरला; उष्ण झळांपासून काहीसा दिलासा
धुळ्यात तापमानाचा पारा घसरला; उष्ण झळांपासून काहीसा दिलासा
Dhule TemperatureSaam tv

धुळे : धुळ्यातील तापमान ४५ अंशाच्‍या वर पोहचले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा दोन ते तीन अंशाने कमी झाला असून आज ४१.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. (dhule news temperature mercury dropped in dhule)

Dhule Temperature
Dhule: सत्ताधारी नगरसेवकाकडूनच सभापतींना घरचा आहेर

गेल्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशापेक्षा जास्त पोहोचला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हा ४१ ते ४२ अंशावर आल्यामुळे काहीशी उष्णता कमी झाली आहे. यामुळे धुळेकरांना (Dhule) काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरीही सध्या 41 अंशापेक्षा पुढेच तापमानाचा पारा आहे.

उष्णतेच्‍या लाटेची शक्‍यता

सध्‍या धुळेकरांना वाढलेल्‍या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे पुढील काही दिवसात पारा पुन्‍हा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.