भाजपनंतर मनसेने हाती घेतले टाळ..म्‍हणाले ‘उद्धवा अजब तुझे सरकार’
मनसे

भाजपनंतर मनसेने हाती घेतले टाळ..म्‍हणाले ‘उद्धवा अजब तुझे सरकार’

भाजपनंतर मनसेने हाती घेतले टाळ..म्‍हणाले ‘उद्धवा अजब तुझे सरकार’

धुळे : कोरोनामुळे अनेक महिन्‍यांपासून मंदीर बंद आहेत. आता हे बंद मंदीर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनंतर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेतर्फे टाळ हाती घेण्यात आले आहे. धुळे मनसे महानगरच्यावतीने एकविरा देवीच्या मंदिराबाहेर टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले. (dhule-news-temple-open-MNS-movement-ekvira-devi-temple)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा याकरीता मंदिर बंद ठेवण्यात आली होती. परंतु, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍याने मंदिर उघडण्याच्‍या मागणीसाठी धुळे शहरातील एकविरा देवीच्या मंदिरा बाहेर मनसेतर्फे मंदिर उघडा आंदोलन करण्यात आले आहे.

मनसे
आता तरी तोंडाला पाने पुसू नका; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा शासनावर निशाणा

राज्‍य शासनाविरोधात घोषणाबाजी

"हे उद्धवा अजब तुझे सरकार बंद मंदिर खुले बार" असं म्हणत मनसेच्यावतीने धुळे शहरातील एकविरा देवीच्या मंदिराबाहेर राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले आहे. राज्यात सर्व हॉटेल बार दारूची दुकाने उघडी करण्यात आली असून फक्त मंदिर वरच कोरोनाचे संकट घोंगावत आहे का? असा संतप्त प्रश्न विचारत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला मंदिर खुली करण्यासंदर्भात आंदोलन करून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com