गोमांस घेऊन जाणाऱ्यास घेतले ताब्‍यात

गोमांस घेऊन जाणाऱ्यास घेतले ताब्‍यात
गोमांस घेऊन जाणाऱ्यास घेतले ताब्‍यात

धुळे : गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनाला पकडून एका संशयितास ताब्यात घेण्याची कारवाई मोहाडी पोलिसांनी केली. (dhule-news-The-beef-carrier-was-taken-into-custody-mogadi-police)

मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका कारमधून अवैधरित्या गोमांसची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी सापळा रचला. त्‍यानुसार माहिती मिळालेली कार आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या वाहनाला अडवले व तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले आहे. यासंदर्भात चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गोमाऊन्स व कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

गोमांस घेऊन जाणाऱ्यास घेतले ताब्‍यात
तुरटीच्या गणेश मूर्तीबाबत आहे संशोधन; विसर्जनानंतर काय आहेत धोके

गोमांस तस्कराची माहिती घेणे सुरू

ताब्यात घेतलेल्या चालकाकडून संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांतर्फे जाणून घेतली जात आहे. या अनुषंगाने मोहाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू असून वाहन कुठून व कुणाकडे नेले जात होते व गोमांस तस्करा संदर्भात खुलासा करण्याचे काम देखील मोहाडी पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com