तृतीयपंथी पोहचले आंदोलनात; धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा

तृतीयपंथी पोहचले आंदोलनात; धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा
तृतीयपंथी पोहचले आंदोलनात; धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा
तृतीयपंथी

धुळे : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्‍या दिवशी सुरू आहे. या संपाला धुळ्यातील यल्लमा ट्रस्टच्यावतीने अर्थात तृतीयपंथीयांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला. तसेच राज्यशासनाविरोधात घोषणाबाजी केली. (dhule-news-The-third-party-reached-and-Support-the-strike-of-ST-employees-in-Dhule)

तृतीयपंथी
शेतकऱ्यांची थट्टा..विम्याची प्रतिगुंठा १३५ रुपये भरपाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपाला धुळ्यातील तृतीयपंथीयांनी देखील पाठिंबा दिला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे म्हणत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे व कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य कराव्यात असे म्हणत आपल्या भावना पाठिंबा देणाऱ्या तृतीयपंथी यांनी व्यक्त केल्या आहेत.

लढा सुरूच ठेवण्याचा दिला सल्‍ला

धुळे मध्यवर्ती बसस्थानकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनस्थळी तृतीयपंथीयांनी पोहोचून सर्व एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच आपल्या मागण्यांसाठी आता माघार न घेता असाच लढा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत कायमस्वरूपी चालू ठेवावा असा सल्ला दिला आहे. यावेळी यल्लामा ट्रस्टच्या मोठ्या संख्येने तृतीयपंथीयांचा यावेळी सहभाग असल्याचे बघावयास मिळाले आहे. यावेळी राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनकर्त्यांनी व तृतीयपंथीयांनी घोषणाबाजी करून राज्य सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधी धोरणा संदर्भात घोषणाबाजी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com