शंभर क्विंटल कांद्याची चोरी; शेतातील चाळीतून केला लंपास

शंभर क्वींटल कांद्याची चोरी; शेतातील चाळीतून केला लंपास
शंभर क्विंटल कांद्याची चोरी; शेतातील चाळीतून केला लंपास
Onion

कुसुंबा (ता. धुळे) : येथील प्रगतीशील शेतकरी सुभाष रामराव शिंदे यांचा चाळीत साठवलेला शंभर क्विंटल कांदा चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केला. यामुळे परीसरातील शेतकऱ्यांध्ये भीती निर्माण झाली आहे. (dhule-news-Theft-of-one-hundred-quintals-of-onions-farmer-loss-three-and-half-lakh)

कुसुंबा येथील सुभाष शिंदे यांनी दिडशे क्विंटल कांदा चाळीत गेल्या पाच महिन्यांपासून साठवून ठेवला होता. गेल्या महिन्यांपासून कांद्यांचे दर वाढत असल्याने टप्प्याटप्याने कांदा काढण्यास सुरवात केली. मागील आठवड्यात पंधरा क्विंटल कांदा त्यांनी विकला. चाळीत १३४ क्विंटल कांदा होता. मात्र चोरट्यांनी त्यातून शंभर क्वींटल कांदा मोठ्या गाडीत भरून लंपास केला आहे. सदर घटना बाजुचे शेतकरी प्रफुल्ल शिंदे हे सकाळी शेतात आल्यानंतर त्यांना मोठ्या गाडीचे टायर गाऱ्यात उमटलेले दिसले व चाळीत कांदा विखुरल्यासारखा दिसल्‍यानंतर लक्षात आली.

साडेतीन लाखाचा कांदा चोरी

प्रफुल्ल शिंदे यांनी लागलीच सुभाष शिंदे व हर्षल शिंदे यांना भ्रमणध्वनीने कळविले. ते शेतात आल्यावर हताश झाले व चाळीतून सुमारे शंभर क्वींटल कांदा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजच्या बाजार भावानुसार सुमारे साडेतीन लाखांचे कांदे होते. त्यांनी तात्काळ धुळे तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पीएसआय आनंद काळे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.

Onion
धुळ्यातील नवदुर्गा आहे जरा हटके..टॉपर असलेल्‍या प्रियंकाचे काम शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी

सहा महिन्‍यांपासून कांद्याचा सांभाळ

परीसरात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे खराब असल्याने कांदा खराब झाला. मात्र मी चार हजार रुपये उच्च प्रतीचे बियाण्यांपासुन रोप तयार करून कांदा लागवड केला होता. म्हणून गेल्या सहा महिन्यांपासुन कांदा चाळीत जशाचा तसा टिकून होता. काही दिवसांपुर्वी भाव कमी होते. मात्र आता भाव वाढत असल्याने टप्याटप्याने कांदा विक्री साठी काढत होतो, अशातच चोरट्यांनी भंभर क्विंटल कांद्यांवर हात साफ केल्याने हाता तोंडाशी आलेला घास गेल्‍याचे शेतकरी सुभाष शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.