तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काही दिले तर नाहीच; पण बाजूला सारले : धनंजय मुंडे

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काही दिले तर नाहीच; पण बाजूला सारले : धनंजय मुंडे
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काही दिले तर नाहीच; पण बाजूला सारले : धनंजय मुंडे
Dhannjay mundhe

धुळे : तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तुमचं किती ऐकलं, काही दिल तर नाही; परंतु त्यांनी बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय विभागातूनच बाजूला केले. अशी टिका करत आपल्याला 'ब' मधून 'क' मध्ये जाण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून जे पणाला लावता येईल ते लावेल; असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी धुळे येथे बोलतांना दिले. (dhule-news-thelari-cast-programe-dhanjay-mundhe-target-fadanvis)

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज धुळे दौऱ्यावर आले आहेत. येथे ठेलारी समाजाच्या कार्यक्रम दरम्यान बोलत होते. भाजप शेतकरी आणि शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या समाजाला समूळ नष्ट करण्याच काम करत असल्याचा आरोप देखील मुंडे यांनी केला.

ठेलारी समाजाच्या मागण्या सोडवू

मुंडे म्हणाले, की वाड्या वस्तीवर राहणारा समाज आणि त्यांचे उपकार इतर समाजावर आहेत. ठेलारी समाजच्या ज्या अडचणी आहेत त्याच अडीचनी आमच्या समाजच्या आहेत. आपल्या सगळ्या मागण्या महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर सोडवू.

लसीचे पैसे मोदींनी पेट्रोल दर वाढवून वसूल केले

मोदींनी लस मोफत दिली परंतु,100 रुपये पेट्रोल घेणार्यांना लस कितीला पडली याचा विचार करा. लसीचे पैसे मोदींनी पेट्रोल दर वाढवून वसूल केलेत.

Related Stories

No stories found.