म्‍हणून शाहरुख खानच्या मुलाला अडकवले : अनिल गोटेंचा भाजपवर निशाणा

म्‍हणून शाहरुख खानच्या मुलाला अडकवले : अनिल गोटेंचा भाजपवर निशाणा
म्‍हणून शाहरुख खानच्या मुलाला अडकवले : अनिल गोटेंचा भाजपवर निशाणा
अनिल गोटे

धुळे : अदानिंच्या बंदरामध्ये २१ हजार कोटी रुपयांचा हेरॉईन सापडले. हे प्रकरण दडपण्यासाठी क्रूज पार्टी प्रकरण उघडकीस आणत शाहरुख खानच्या मुलाला अडकवले असल्याचा आरोप भाजपवर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी लावला आहे. (dhule-news-thelari-melava-ncp-leader-anil-gote-target-bjp)

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ठेलारी समाजाच्या मेळाव्यादरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये अनिल गोटे यांनी केलेल्या भाषणातून भाजपचा आपल्या कठोर शब्द शैलीमध्ये समाचार घेतला.

अनिल गोटे
ईडी आणि इन्कम टॅक्स भाजप सरकार चालवतेय; जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा

ईडी लावून भाजप झाली येडी

मागील वर्ष– दोन वर्षात ईडीची चौकशी अनेकांच्‍या मागे लावली गेली. भाजप विरोधी भुमिका घेणाऱ्याच्‍या मागे ईडीची चौकशी लावली जात आहे. भाजप ईडी लावून लावून येडी झाली असल्याचे देखील वक्तव्य गोटे यांनी यावेळी आपल्या भाषणादरम्यान केले आहे.

Related Stories

No stories found.