मुसळधार पावसाने शेतात पाणी; कांदा, सोयाबिनचे नुकसान

मुसळधार पावसाने शेतात पाणी; कांदा, सोयाबिनचे नुकसान
मुसळधार पावसाने शेतात पाणी; कांदा, सोयाबिनचे नुकसान
Heavy Rain

धुळे : धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. (dhule-news-Torrential-rains-water-the-fields-Damage-to-onions-soybeans)

धुळे शहरासह तालुक्यामध्ये रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यातील आणि शिवारामध्ये अक्षरशः शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे बघावयास मिळत आहे. या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे.

आधीच लांबलेल्‍या पावसामुळे नुकसान

गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारलेली होती. अधून-मधून बारीक- सारीक रिमझिम असा पाऊस होत होता. परंतु रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर शेतामध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे आता शेतकऱ्याने कसं बस जगवलेले पिक सडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

Heavy Rain
वीजचोरांना दणका..जळगाव जिल्ह्यात ११२ जणांवर कारवाई

कांदा सोयाबीनचे नुकसान

कांदा सोयाबीन त्याचबरोबर कपाशी या पिकांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हे पीक आता खराब होण्याची भीती देखील परिसरातील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अशा पद्धतीची मागणी देखील या शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com