नदीत विषारी रसायन; माशांच्‍या मृत्‍यू

नदीत विषारी रसायन; माशांच्‍या मृत्‍यू
नदीत विषारी रसायन; माशांच्‍या मृत्‍यू

धुळे : पांझरा नदीलगत असलेल्‍या नाल्यात अज्ञाताने विषारी रसायन टाकले. नाल्‍यातील हे रसायन नदीत गेल्याने नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे गाव व परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. (dhule-news-Toxic-chemicals-in-the-panjhara-river-and-fish-death)

धुळे तालुक्यातील नेर येथील अक्कलपाडा तसेच भदाणे शिवारातील हॉटेल फौजीजवळ पांझरा नदीलगत नाल्यातील पाण्यात अज्ञात व्यक्तीकडून रसायन पाण्यात सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रवाहात असणारे पाणी पिवळसर झाले असून अक्कलपाडा, नवे भदाणे, जुने भदाणे, देऊर, नेर आदी गावांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या पांझरा नदीकाठी आहेत. यामुळे ग्रामस्‍थांना धोका निर्माण होऊ नये म्‍हणून नेर येथे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

नदीत विषारी रसायन; माशांच्‍या मृत्‍यू
शिवेंद्रसिंहराजेंचा नामाेल्लेख टाळत उदयनराजेंनी लगावला टाेला

विहिरीतून घेतले पाण्याचे नमुने

नदीपात्रातील माशांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. यामुढे मोठी दुर्घटना होऊ नये; यासाठी नेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी नेर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विहिरीतील पाण्याचे नमुने तत्काळ तपासणीसाठी घ्यावेत, अशा सूचना केल्या त्यानुसार पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाण्याचे नमुने घेऊन धुळे जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com