कत्‍तलीसाठी जनावरांची वाहतुक; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात

कत्‍तलीसाठी जनावरांची वाहतुक; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात
कत्‍तलीसाठी जनावरांची वाहतुक; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात
Animal

धुळे : गाडीत कोंबुन कत्तलीच्या उद्देशाने अवैधपणे वाहतूक सुरू होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्‍यानंतर कारवाई करत १४ जनावरांची सुटका करून पोलिसांनी दोघा जणांच्या ताब्‍यात घेतले. (dhule-news-Transport-of-animals-for-slaughter-The-police-took-both-of-them-into-custody)

Animal
‘पोर्नोग्राफी’चा डाग.. जळगाव-धुळ्यासह देशभरात सीबीआयचे छापे

जनावरांना निर्दयीपणे वाहनांत कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोहाडी पोलिसांनी कारवाई करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळत जवळपास चौदा जनावरांची सुटका केली. चार चाकी मालवाहू वाहनामध्ये १४ जनावरांना अमानुषपणे कोंबून सोनगीरहुन मालेगावला कत्तलीच्या उद्देशाने नेणाऱ्या वाहनाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाई दरम्यान १४ जनावरे व एक चार चाकी वाहन असा अंदाजे सहा लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सर्व जनावरे गोवंश जातीचे

चार चाकी मालवाहू वाहनांमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई- आग्रा महामार्गावर अवधान टोल नाक्यावर सापळा रचून संशयित मालवाहू वाहनाला थांबून त्याची झडती घेतली. वाहनामध्ये निर्दयीपणे कोंबलेली १४ गोवंश जनावरे पोलिसांना आढळली. या जनावरांना वाहनामध्ये निर्दयीपणे कोंबून सोनगीर हुन मालेगाव च्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे आढळून आले. मोहाडी पोलिसांनी वाहनासह दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com