मंत्री जयंत पाटलांसोबत एकाच वाहनातून प्रवास; फडणवीसांचे काय आहे स्पष्टीकरण

मंत्री जयंत पाटलांसोबत एकाच वाहनातून प्रवास; फडणवीसांचे काय आहे स्पष्टीकरण
Devendra Fadanavis
Devendra Fadanavis

धुळे : राष्ट्रवादीचे प्रदेक्षाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडवणीस यांनी एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळापर्यत एकत्र प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये आजी– माजीबाबत केलेल्या विधानानंतर जयंत पाटील व फडवणीस यांच्‍या एकत्र प्रवासाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्‍या. मात्र याबाबत फडवणीसांनी धुळे स्‍पष्‍टीकरण केले आहे. (dhule-news-Travel-in-the-same-vehicle-with-Minister-Jayant-Patil-devendra-Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांचे जयंत पाटलान सोबत नंदुरबार येथे एकाच गाडीतून प्रवास केल्यानंतर धुळ्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी दिले उत्तर. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एकत्र एकाच वाहनातून प्रवास केल्यानंतर राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले असतांना धुळ्यात एका उद्‌घाटन कार्यक्रमाप्रसंगी माध्यमांशी बोलतांना फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

म्‍हणे राजकारण सिरीयस बिझिनेस..

फडणवीस म्‍‍हणाले, की आज मी आणि जयंत पाटील एक व्यासपीठावर आलो किंवा एक गाडीत दिसलो याचा अर्थ वेगळा घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझिनेस आहे. कोणी काय बोलले या वर लगेच अंदाज बांधू नये.

Devendra Fadanavis
भविष्यनिर्वाह निधीचे कामकाज शालार्थ प्रणालीशी जोडणार

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल त्याचबरोबर माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी आमदार अमरीशभाई पटेल यांनी राबविलेला शिरपूर पॅटर्न त्याचबरोबर उभारलेल्या विद्यानगरीचे फडणवीसांनी कौतुक करीत आपल्याकडे शब्द अपुरे पडत असल्याचे म्हणत अमरीशभाई यांच्या विकास कामांचे कौतुक केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com