लस घेतली तरच मिळणार रेशन अन् शासकीय योजनांचा लाभ
corona vaccination

लस घेतली तरच मिळणार रेशन अन् शासकीय योजनांचा लाभ

लस घेतली तरच मिळणार रेशन अन् शासकीय योजनांचा लाभ

धुळे : कोरोनाची लस घेतली नाही, तर रेशनचे धान्य, सातबारा उतारा, ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले तसेच कुठल्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत. असा अनोखा निर्णय शिरपूर तालुक्यातील त-हाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे. यामुळे लसीकरणास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना चांगलाच चाप बसणार असल्याने ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (dhule-news-trhadi-gram-panchayat-benefit-of-ration-and-government-schemes-will-be-available-only-if-corona-vaccinated)

corona vaccination
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची हजेरी आता फेस रीडिंगद्वारे

राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागातर्फे वर्तविली आहे. या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे गरजेचे असल्याने त्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच प्रथम लोकनियुक्त जयश्री धनगर यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला. यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार असून लस घेण्यापासून दूर पाळणाऱ्यांना या निर्णयामुळे लस घेण्याशिवाय पर्याय उरला नाहीये.

नागरीकांचा कानाडोळा म्‍हणून

आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा, गावोगावी- घरोघरी जाऊन शिबिराद्वारे नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवत आहे. मात्र असे असले तरी प्रशासनाच्या लसीकरण मोहिमेकडे अनेक नागरिक कानाडोळा करत लसीकरण करून घेत नसल्याची बाब पुढे आली आहे. यावर उपाय म्हणून शिरपूर तालुक्यातील त-हाडी ग्रामपंचायतीने भन्नाट युक्ती करायचे ठरवले आहे.

पहिला असो वा दुसरा डोस

कोरोना प्रतिबंधक लसीचा अद्यापही पहिला डोस तसेच पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोससाठी ठरवून दिलेला कालावधी उलटूनही दुसरा डोस घेतलेला नाही. अशा नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारे धान्य, तलाठ्यांकडून देण्यात येणारा सातबारा उतारा तसेच ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले, कागदपत्रे आणि योजनांचा लाभ मिळणार नसल्याचा निर्णय नुकताच त-हाडी ग्रामपंचायतीने घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com