Dhule: दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या दुचाकी चोरांना पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. (Dhule News Bike Robbery)

Dhule News
Akola: मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचा नदीपात्रातुन जीवघेणा प्रवास

धुळ्यात (Dhule) गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. याबाबत प्राप्‍त तक्रारीच्‍या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Dhule LCB) अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली असता पथकाने धुळे शहरातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेतले व दुचाकीचोरी संदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

धुळे तालुका पोलिसांच्‍या स्‍वाधिक

दोघाही चोरट्यांना धुळे तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी आणखी कुठे कुठे दुचाकी चोरी केल्या आहेत. याचा संपूर्ण तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथका सह धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com