धुळ्यातील व्यापाऱ्याची मागणी अन्‌ केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची तात्‍काळ दखल
Nitin Gadkari

धुळ्यातील व्यापाऱ्याची मागणी अन्‌ केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची तात्‍काळ दखल

धुळ्यातील व्यापाऱ्याची मागणी अन्‌ केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची तात्‍काळ दखल

धुळे : धुळ्यातील व्‍यापारी असलेले जयेश बाफना यांनी धुळ्याकडे जाणाऱ्या चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपुलाची मागणी केली. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लागलीच दखल घेत उड्डाणपुलासाठी प्राथमिक स्वरूपात मान्यता दिली आहे. (dhule-news-Union-Minister-Nitin-Gadkari-immediately-took-note-of-the-demand-of-Dhule-traders)

धुळे शहरालगत मुंबई– आग्रा महामार्गावर असलेल्या चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपुला संदर्भात जयेश बाफना यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पत्रातून मागणी केली होती. बाफना यांनी केलेल्या उड्डाणपुलाच्या मागणीची दखल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घेतली.

असा आहे पत्रात उल्‍लेख

चाळीसगाव चौफुली परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपूल संपतो. त्या परिसरात शाळा आणि लोकवस्ती हाकेच्या अंतरावर आहे. नेमके त्याच ठिकाणी हायवेचे जंक्शन आहे. रस्ता सुरक्षा धोरणानुसार त्या ठिकाणी उड्डाणपूल आवश्यक आहे. पण सबंधीत उड्डाणपूलाची निर्मिती करतांना काही महत्वपुर्ण बाबी दुर्लक्षित झाल्या. या सदोष रचनेमुळे आतापर्यंत लहान मोठे हजारो अपघात झाले आहेत. त्यात शेकडो निरापराधांचे प्राण गेले आहेत. जयेश बाफना यांनी पत्रात या सर्व बाबी लक्षात आणून दिल्याने पत्र हाती पडताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सबंधित यंत्रणेकडे ते पत्र परिक्षणार्थ तातडीने रवाना केले आहे. आज रोजी जयेश बाफना यांनी माध्यमांशी बोलताना याबाबदची माहिती दिली आहे.

Nitin Gadkari
मुंबई- आग्रा महामार्ग; खड्ड्यात उभे दाखविला मार्ग, समाजवादी पार्टीचे आंदोलन

लवकरच कार्यवाहीचे पत्रातून आश्‍वासन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बाफना यांनी पाठविलेल्या पत्राची गंभीर दखल घेत त्या ठिकाणी उड्डाणपुलासाठी प्राथमिक स्वरूपात मान्यता दिली आहे. पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल असे पत्रातून केंद्रीय मंत्र्यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com