बेशिस्तपणे पार्किंग..रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा; पाच रिक्षा ताब्‍यात

बेशिस्तपणे पार्किंग..रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा; पाच रिक्षा ताब्‍यात
बेशिस्तपणे पार्किंग..रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा; पाच रिक्षा ताब्‍यात
रिक्षा

भूषण अहिरे

धुळे : शहरामध्ये अनावश्‍यक व चुकीच्या जागेत पार्किंग करणाऱ्या रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. यामुळे धुळे शहर वाहतूक विभागाच्यावतीने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. (dhule-news-Unruly-parking-traffic-police-action-against-rickshaw-pullers)

धुळे शहरातील विविध ठिकाणी पार्किंग असतानादेखील पार्किंगच्या व्यतिरिक्त रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होण्यास कारण ठरणाऱ्या पाच रिक्षा धुळे शहर वाहतूक विभागातर्फे ताब्यात घेण्यात आल्या आहेत. धुळे शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी संगीता राऊत यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली असून धुळे शहरातील रिक्षा चालकांना शिस्तबद्धपणे रिक्षा पार्किंग करणे व चालविण्याचे आवाहन देखील यावेळी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रिक्षा
धुळ्यात गावठी कट्ट्यांचा वाढला वापर; दोघांच्या गावठी कट्ट्यासह आवळल्या मुसक्या

कारवाई राहणार सुरूच

बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी अशाच पद्धतीची धडक कारवाई यापुढे देखील राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पार्किंगचे नियम पाळून वाहतुकीस अडथळा होणार नाही; याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com