रिमझिम पावसाने स्‍वेटरसोबत छत्रीही सोबतीला; धुळ्यात अवकाळी

रिमझिम पावसाने स्‍वेटरसोबत छत्रीही सोबतीला; धुळ्यात अवकाळी
rain
rain

धुळे : अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. धुळ्यात देखील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे आईन हिवाळ्यात रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे स्वेटर, टोपी बरोबरच नागरिकांना छत्री घेऊन बाहेर पडावे लागत आहे.

rain
जळगावात अवकाळी पावसाची हजेरी

हवामान विभागातर्फे धुळ्यात पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार सकाळपासूनच धुळ्यामध्ये ढगाळ वातावरण होते. परंतु, दुपारनंतर धुळे शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर जिल्ह्यातील शिरपूर, साक्री येथे देखील तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. तर शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे बघायला मिळाले आहे.

गारठा वाढला

आधीच गेल्या तीन दिवसांपासून धुळ्यामध्ये दहा अंश पेक्षा कमी तापमान असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झालेला होता. परंतु आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण व दुपारनंतर झालेल्या पावसामुळे हवेत आणखीनच गारवा निर्माण झाला असून नागरिकांना ऐन हिवाळ्यात स्वेटर, टोपी बरोबरच छत्री देखील घेऊन बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com