गणेशोत्सव केला रद्द; खर्चातून विधायक उपक्रम

गणेशोत्सव केला रद्द; खर्चातून विधायक उपक्रम
गणेशोत्सव केला रद्द; खर्चातून विधायक उपक्रम
गणेशोत्सव

धुळे : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे शहरातील जयहिंद कॉलनी परिसरातील इंदिरा गार्डन भागातील तीनशेवर तरूणांनी स्थापन केलेल्या वंदे मातरम् प्रतिष्ठानने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला आहे. मात्र, गणेशोत्सवावरील खर्चातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यात कोरोना योद्ध्यांचा गौरव, कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर जनजागृती, रक्तदान शिबिर आदी उपक्रम घेतले जातील. (dhule-news-vande-mataram-pratishthan-cancel-ganesh-festival-and-other-programe)

देवपूरमधील इंदिरा गार्डन परिसरात वंदे मातरम् प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानतर्फे सामाजिक एकोप्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. तसेच समाज प्रबोधन केले जाते. गणेशोत्सवात दरवर्षी रक्तदान शिबिर होते. वृक्षलागवडीसह स्वच्छतेच्या कार्यावरही भर दिला जातो. सुरक्षेसाठी प्रतिष्ठानने इंदिरा गार्डन, जयहिंद चौकासह प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे टवाळखोरांना लगाम लागला. याबाबत पोलिसांना मदत झाली आहे. तसेच जयहिंद कॉलनीपासून पाटीलनगरपर्यंत वृक्षारोपण केले आहे. तरूणाईचे संघटन एकोपा आणि आदर्शवत कार्य कसे उभारू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून या प्रतिष्ठानकडे पाहिले जाते.

वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या गणेश मंडळात सुशील बोरसे, डॉ. संदीप पाटील, गिरीश मराठे, मिलिंद बोरसे, सुधीर बोरसे, श्यामकांत बोरसे, कृपेश नांद्रे, कमलेश देवरे, प्रा. सागर चौधरी, संदीप पाटील, सचिन बोरसे, हरीश चौधरी, राजू मेखा, सचिन दहिते, भारत वाघ, सुनील पाटील, जितू पाटील, दीपक काकुस्ते, भटू चौधरी, हेमंत भदाणे, सिद्धार्थ शिंदे, प्रवीण पाटील, कीर्तिकुमार साळुंखे, नीलेश राजपूत, प्रमोद पाटील, अ‍ॅड. श्यामकांत पाटील, डॉ. नीलेश सोनवणे, डॉ. योगेश ठाकरे, अ‍ॅड. समीर सोनवणे, समीर पाटील, शरद पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. राजेश पवार, वर्धमान सिंघवी, संजय ठाकरे यांच्यासह पदाधिकारी समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात.

गणेशोत्सव
धक्‍कादायक..फेसबुकवरुन कुटूंबाचे फोटो काढून ब्लॅकमेलींग

लवकरच रक्तदान शिबिर

गणेशोत्सवात दरवर्षी वंदे मातरम् प्रतिष्ठानतर्फे विविध विधायक उपक्रम राबवले जातात. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव झाला. त्यात चिनी मालावर बहिष्कार, वृक्षसंवर्धन, स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रवाद, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रमांचा समावेश आहे. गरजूंना किराणा दिला. गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने त्यांना फराळ वाटप झाले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या‍ लाटेमुळे यंदा गणेशोत्सव रद्द झाला. मात्र, गणेशोत्सवावर खर्च होणारी रक्कम सामाजिक कार्यावर खर्च होईल, असे सांगत प्रतिष्ठानने रक्तदान शिबीराचे नियोजन केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com