अमरीश पटेलांविरोधात महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल

अमरीश पटेलांविरोधात महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल
अमरीश पटेलांविरोधात महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल
amrish patel

धुळे : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने अमरीशभाई पटेल यांनी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे विधानपरीषदेच्‍या निवडणुकीत केाण बाजी मारणार याकडे लक्ष लागत राहणार आहे. (dhule-news-vidhan-parishad-election-Mahavikas-Aghadi-files-application-against-Amrish-Patel)

amrish patel
थरार..वाळूने भरलेला ट्रॅक्‍टर चढला रिक्षावर; महसूलच्‍या कर्मचारींकडून सुरू होता पाठलाग

धुळे व नंदुरबार विधानपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखलचा आज अंतिम दिवस होता. विधानपरीषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र महाविकास आघाडीतर्फे उमेदवार जाहीर झाला नव्‍हता. अखेरच्‍या दिवशी महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपतर्फे अमरीश पटेल यांनी देखील अर्ज दाखल केला.

पटेलांचा विजयी रथ थांबविणार

विधान परिषदेच्या निवडणुकीत २५० मते मिळवत विजयी होणार असल्याचा दावा अमरीश पटेल यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीचे गौरव वाणी यांनी या निवडणुकीत चमत्कार घडवत अमरिशभाई पटेल यांचा विजयी रथ थांबवत विजय मिळविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com