विधानपरिषद निवडणुक..धुळ्यातून अमरीश पटेलांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब

विधानपरिषद निवडणुक..धुळ्यातून अमरीश पटेलांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब
विधानपरिषद निवडणुक..धुळ्यातून अमरीश पटेलांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब
amrish patel

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्‍हा विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे नाव निश्‍चीत केले आहे. यात आमदार अमरीश पटेल यांच्‍या नावावर भाजपतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र पटेल यांच्‍या विरोधात कोणास उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यातच आहे. (dhule-news-vidhan-parishade-election-bjp-Amrish-Patel-name-final-from-Dhule)

amrish patel
अवकाळी पाऊस..द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान

विधानपरीषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. यासंदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली.

मुंबईतील बैठकीन नाव निश्‍चीत

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना बघावयास मिळाला. परंतु या निवडणुकीत देखील भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळेल का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिल आहे. त्यातच आता भाजपकडून विधान परिषदेची जागा जिंकण्यासाठी कंबर कसल्याच दिसून येत आहे. मुंबई येथे झालेल्‍या बैठकीत बैठकीत धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विरोधकांकडून अद्याप नाव नाही

दुसरीकडे विरोधी गटातर्फे अद्याप उमेदवाराचे नाव घोषित झालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे भाजपचा उमेदवार अमरीशभाई पटेल यांना शह देण्यासाठी कोणत्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते याकडेच संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पटेलांना कॉंग्रेस‍ नगरसेवकांचेही होते मत

गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे 199 सदस्य असताना आमदार पटेल यांना तब्बल 332 मते मिळाली होती. शिरपूर नगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी भाजपचे आमदार अमरीश पटेल यांना मतदान केले होते. पण काँग्रेसकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. आमदार पटेल यांच्या विरोधात कोण उमेदवारी करतो; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. येत्या चार दिवसांत विरोधकांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com