Dhule: शिरपूर तालुक्यात 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी मतदान

शिरपूर तालुक्यात 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी मतदान
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv

धुळे : शिरपूर तालुक्यात 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून मतदानासाठी (Election News) सुरुवात झाली आहे. या मतदान प्रक्रियेसाठी 122 प्रभागांमध्ये 126 बुत प्रशासनातर्फे तयार करण्यात आले आहेत. (Dhule News Gram Panchayat Election)

संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी 630 कर्मचाऱ्यांची (Dhule) प्रशासनातर्फे नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 126 ईव्हीएम मशीन देखील मतदानासाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. 33 ग्रामपंचायतींमध्ये जवळपास 339 सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये माघारीनंतर 87 सदस्यांची निवडणूक ही बिनविरोध झालेली असल्यामुळे 252 ग्रामपंचायत सदस्य व 33 सरपंच पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यासंदर्भात उद्या मतमोजणी प्रक्रिया होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जनतेमधूनच थेट सरपंच निवड होणार असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com