तापी नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा; धुळे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

तापी नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा; धुळे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
तापी नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा; धुळे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
Hatnur dam

धुळे : हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात १८ हजार १८७ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळ धुळे जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (dhule-news-Warning-to-villages-near-Tapi-river-basin-Appeal-of-Dhule-Collector-jalaj-sharma)

गेल्या काही दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळेच प्रशासनातर्फे धरणाचे बारा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तापी नदीचे दोन्‍ही काठांपर्यंत पाणी पोहचले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्‍यास धरणातील पाणी पातळी वाढण्याची शक्‍यता आहे.

Hatnur dam
आदिवासी विकास मंत्र्यांचा जिल्‍हाच खावटीपासून भुकेला; कुटुंबापर्यंत पोहचला नाही लाभ

जिल्‍हाधिकारींचे आवाहन

तापी नदी पात्रामध्ये प्रचंड पाण्याची वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com