मृत एसटी कर्मचाऱ्याची पत्नी बनली रणरागिणी; बाहेर जाणारी बस रोखली

मृत एसटी कर्मचाऱ्याची पत्नी बनली रणरागिणी; बाहेर जाणारी बस रोखली
st strike
st strike

धुळे : साक्री आगारातील कर्मचारीने तीन महिन्‍यांपुर्वी वेतन मिळत नसल्‍याने आलेल्‍या नैराश्‍यातून आत्‍महत्‍या केली होती. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्‍या सुरू असलेल्‍या आंदोलनानंतर बस सुरू केली जात आहे. परंतु, त्‍या मृत कर्मचारीच्‍या पत्‍नीने मोर्चा सांभाळत आगारातून बाहेर जात असलेली बस रोखली. या रणरागिणीसमोर एसटी प्रशासन देखील हतबल झाले. (dhule-news-wife-of-deceased-ST-employee-The-oncoming-bus-stopped--sakri-Depot)

st strike
महाविकास आघाडीत बिघाडी; राष्‍ट्रवादी– सेनेचा एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी जवळपास महिनाभरापासून धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संप सुरू असताना देखील एसटी प्रशासनातर्फे बस सेवा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे प्रशासनाच्‍या विरोधात कर्मचारींच्‍या परिवाराकडून पाऊले उचलली जात आहेत.

मृत बेडसेंची पत्‍नी बसस्‍थानकात

तीन महिन्यांपूर्वीच साक्री आगारातील एसटी कर्मचारी कमलाकर बेडसे यांनी हालाखीच्‍या परिस्थितीमुळे तसेच जवळपास तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे नैराश्यातून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या मृत एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आता त्यांचा मोर्चा सांभाळला आहे. साक्री आगार बसस्‍थानकातून संप सुरू असताना देखील बस बाहेर काढण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न या महिला रणरागिणीने हाणून पाडला. बस समोर उभे राहून बस बाहेर न काढण्याचे आवाहन चालकांना केले.

अन्‍य महिलाही आल्‍या सोबतीला

या महिला रणरागिणीसोबतच आणखी एसटी कर्मचारी आंदोलनात महिला रणरागिणी देखील घेऊन भिडल्या. त्यांनी एकत्रितरित्या बाहेर काढण्यात येत असलेल्या दोन बस समोर उभे राहून घोषणाबाजी केली. महिला रणरागिणींचे रुद्र रूप बघून एसटी प्रशासन हतबल झाले. प्रशासनाने तात्काळ या बस डेपो बाहेर न घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी या महिला रणरागिणीने एसटी संपामध्ये सामील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन करत त्यांच्या पतीचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com