
धुळे : आक्षेपार्ह विधान केल्याबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या समाजकंटकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. या मागणीसाठी महिलांनी आज (Dhule News) पुन्हा भव्य मोर्चा काढला. (dhule news Women beaten at police station Demand for action against rioters)
गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी मोबाईलवरून एका विशिष्ट समाजाविषयी व समाजाच्या पवित्र प्रार्थनेविषयी आक्षेपार्ह विधान फोनद्वारे केल्याप्रकरणी धुळे (Dhule) शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य राखत चौघा जणांना तात्काळ ताब्यात घेतले होते. परंतु जातीवाचक फोनवरून संभाषण करणाऱ्या या चौघां आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच आणखी वाढीव कलमांद्वारे या चारही समाजकंटकांवर पोलीस (Police) प्रशासनातर्फे कारवाई करण्यात यावी; या मागणीसाठी आज साक्री रोड परिसरातील भीमनगर येथील मोठ्या संख्येने महिलांनी मोर्चा काढला.
महिलांची घोषणाबाजी
मोर्चादरम्यान या महिलांनी या समाजकंटकां विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून तीव्र संताप व्यक्त केला. तसेच पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांना या आशयाचे निवेदन देऊन या समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील या मोर्चेकरी महिलांनी केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.