भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने टळली जीवित हानी!

शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास थरार...
भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने टळली जीवित हानी!
भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने टळली जीवित हानी!SaamTvNews

धुळे : शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान भाजपचे पदाधिकारी कामराज निकम यांचा लहान मुलगा चालवत असलेल्या चारचाकी (Car) वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान दाखवत कार चालकाने तात्काळ कार थांबून वाहना बाहेर उडी घेताच कारणे मोठ्या प्रमाणात पेट घेतला.

हे देखील पहा :

ग्रामस्थांना याबाबतची माहिती कळताच ग्रामस्थांनी आग (Fire) विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, ग्रामस्थांच्या प्रयत्नांच्या आधीच कार ने मोठ्याप्रमाणात पेट घेतल्यामुळे काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली. या दुर्घटनेमध्ये (Accident) सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसून कार मात्र पूर्णतः जळून खाक झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com