धुळे : ST महामंडळाच्या विलीनीकरणाचा चेंडू आता थेट ग्रामपंचायतीत!

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातील परिवहन विभागाचे अधिकारी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची कैफियत घेऊन थेट शिंदखेडा तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायतमध्ये पोहोचले.
ST महामंडळाच्या विलीनीकरणाचा चेंडू आता थेट ग्रामपंचायतीत!
ST महामंडळाच्या विलीनीकरणाचा चेंडू आता थेट ग्रामपंचायतीत!SaamTvNews

धुळे : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबद राज्यशासनामध्ये व आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद सध्या न्यायप्रविष्ट असताना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातील परिवहन विभागाचे अधिकारी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची कैफियत घेऊन थेट शिंदखेडा तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायतमध्ये पोहोचले. परंतु एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलन मोडीत काढण्याचा परिवहन अधिकाऱ्यांचा हा देखील प्रयत्न ग्रामपंचायतीच्या भरसभेत हाणून पाडला आहे.

हे देखील पहा :

सध्या एसटी महामंडळाचे राज्यशासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलनावर ठाम असलेल्या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे तसेच राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दाखविण्यात येत असलेला कारवाईचा धाक तसेच मानधनामध्ये वाढ हे सर्व प्रयत्न निकामी ठरल्यानंतर आता गावागावात जाऊन परिवहन महामंडळाचे अधिकारी थेट ग्रामपंचायतीमार्फत हा प्रश्न सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

ST महामंडळाच्या विलीनीकरणाचा चेंडू आता थेट ग्रामपंचायतीत!
बांग्लादेशी अभिनेत्रीची पतीनेच मित्राच्या मदतीने केली हत्या; मृतदेह गोणीत भरून फेकला!

याचाच एक भाग म्हणून शिंदखेडा तालुक्यातील मालपुर ग्रामपंचायतीमध्ये परिवहन विभागाचे काही अधिकारी थेट ग्रामपंचायती मध्ये जाऊन सरपंचांकडे तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडे मालपुर गावातील आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासंदर्भात हस्तक्षेप करावा अशी मागणी घेऊन गेले. परिवहन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मालपुर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तसेच सरपंचांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना बोलून सभा देखील घेतली या सभेमध्ये परिवहन विभागातर्फे आलेल्या अधिकाऱ्यांची बाजू आंदोलक एसटी कर्मचाऱ्यां समोर मांडण्यात आली, परंतु आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या सभेत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित केले.

ST महामंडळाच्या विलीनीकरणाचा चेंडू आता थेट ग्रामपंचायतीत!
Breaking : नेपाळच्या गायिकेचा अंबरनाथच्या महिलेला साडे सहा कोटींना गंडा!

गेल्या दोन महिन्यांपासून हे अधिकारी होते तरी कुठे, कारण गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलना दरम्यान कुठल्याही प्रकारचे वेतन एसटी प्रशासनातर्फे देण्यात आले नाहीये, आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढावली असताना एसटी प्रशासनातर्फे साधी विचारणा करण्यासाठी देखील कुठलाही अधिकारी या कर्मचाऱ्यांकडे आला नाही. व आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात पोहोचले असतांना ते मोडीत काढण्यासाठी अधिकारी थेट ग्रामपंचायतीत आले तरी यावर तोडगा निघणार तरी कसा असा संतप्त प्रश्न आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी ग्रामसभेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना विचारला.

ST महामंडळाच्या विलीनीकरणाचा चेंडू आता थेट ग्रामपंचायतीत!
कस्टडीत पोलिसांनी लैंगिक छळ केला; आरोपीच्या तक्रारीने अकोल्यात खळबळ

एकीकडे कारवाईचा बडगा उगारणाऱ्या एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही सुखदुःखाची परवा नसल्याचा आरोप देखील यावेळी एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर लावला आहे. मालपुर येथील एका आंदोलक एसटी कर्मचाऱ्याला तर एसटी प्रशासनातर्फे चक्क दंडाची कारवाई करण्यासाठी चक्क सात कोटी रुपयांचा दंड पाठवला आहे. आता या एसटी कर्मचाऱ्याकडे एवढे पैसे असते तर तो एसटी महामंडळामध्ये तुटपुंज्या पगारावर कसा रुजू झाला असता हे देखील भान या दंड पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांना नसावे का. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये एसटी आंदोलन कर्मचाऱ्यांनी परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांचा प्रस्ताव थेट नाकारत अधिकाऱ्यांचीच पंचायत केली. आता जाऊ तर राज्य शासनात नाहीतर स्मशानात असेच काहीसे उत्तर या अधिकाऱ्यांना आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com